• नात्याला काळीमा; पुणे आणखी एकदा हादरलं
पुणे | पुण्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. शेलपिंपळगावमध्ये चुलतभावाने वहिनीचा अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, तर टॅक्सीत चालकाने एका महिलेशी अश्लील वर्तन केलं आणि एसटी बसमध्ये बलात्काराची घटना घडली. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुणे आज दुसऱ्यांदा हादरलंय. पुण्यात शिवाशाही बसमधील बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना उघड झाली आहे. सख्खा दिरानेच वहिनीच्या अंघोळीचं शुटिंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वहिनीच्या हे लक्षात येताच तिने हा प्रकार सर्वांसमोर आणला आहे. नात्यालाच काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आल्याने पुणे हादरून गेलं आहे. त्यामुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याहीपेक्षा समाजातील अशा विकृतींना कसा पायबंद घालायचा? हा प्रश्न उभा ठाकला आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दीर -वहिनीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडलीये. चुलत वाहिनी अंघोळ करत असताना, बाथरूमच्या मागील खिडकीतून दीर व्हिडीओ शूटिंग करायला आला. मात्र वहिनीच्या लक्षात ही बाब आल्यानं तिने लगेचच बोंबाबोंब केली. तिने दिराची ही विकृती समाजासमोर आणली. खेड तालुक्यातील शेलपिंपळगावात पहाटे ही घटना घडलीये. या प्रकरणी चाकण पोलिसांनी नराधम चुलत दिराला ताब्यात घेतलेलं असून पुढील कारवाई सुरु आहे.
टॅक्सीतील घाणेरडा प्रकार
पुण्यात टॅक्सीतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब चालकाने सॉफ्टवेअर इंजिनियर्स असलेल्या महिलेसमोर अश्लील कृत्य केलं. 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 वाजता या महिलेने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली होती. ही कॅब संगमवाडी रोडवर आली. त्यावेळी आरोपी ड्रायव्हरने या कॅबमधील आरशातून महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरवात केली. त्यामुळे ही महिला घाबरली. तिने तात्काळ टॅक्सी थांबवायला सांगून पोलिसात तक्रार केली. पोलिसांनीही या घटनेची तात्काळ दखल घेऊन आरोपीला अटक केली आहे.
पुण्यात एसटीत महिलेवर बलात्कार
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाजवळ शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने एकदा नव्हे तर दोनदा पीडितेवर बलात्कार केला. या घटनेमुळे पुणेच नव्हे तर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आरोपी फरार असून पोलिसांच 13 पथकं त्याचा शोध घेत आहेत. आरोपीला फरार घोषित करण्यात आलं असून पकडून देणाऱ्यांना 1 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. आरोपीचं नाव गाडे असं आहे
