घुग्घुस: येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शिवजयंतीनिमित्त बुधवार, १९ फेब्रुवारीला शीतपेय व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
युवा बजरंग क्रीडा मंडळ व शिवजयंती उत्सव समिती घुग्घुसतर्फे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
मिरवणूक मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राजवळ येताच मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांना शीतपेय व पाणी बॉटलचे वाटप भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, निरीक्षण तांड्रा, बंटी भोस्कर, प्रमोद भोस्कर, विलास भोस्कर, असगर खान, योगेश घोडके, उमेश दडमल, गणेश राजूरकर, सुनंदा लिहीतकर, भारती परते, स्वाती गंगाधरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
