नांदरा – तालुक्यातील वसाडी बु . आणि वसाडी खु . या दोन्ही गावांमिळून दी . २९ / ९ / २०२४ रोजी महाकवि वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोदडे यांच्या सयुक्त जयंती निमित्त मुंबई येथील प्राख्यात शाहीर कवि – गायक – विष्णुअन्ना शिंदे यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी तालुक्यातील असंख्य महीला पुरुषांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला . विष्णुअन्ना शिंदे यांनी केलेल्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला उपस्थित गावातील सर्व जातीच्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला . विष्णुअन्ना शिंदे यांनी त्यांच्या गायनातून वास्तव मांडले . आणि एका छोट्याशा खेडयात कार्यक्रम रेकॉर्ड ब्रेक झाला . हे मात्र विषेश .
