
आय .टि . आय . कॉलेज संग्रामपुर येथे एस टी बसला थांबा द्या !
जळगांव जा . – जळगांव जा .शहर आणि तालुक्यातील गावांमधील बरेच विद्यार्थी आय . टि . आय . कॉलेज संग्रामपुर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी जातात परंतु सदर ठीकानी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना २ किलोमीटर पायी चालत जावे लागते . तरी जळगांव जामोद एस टी डेपो मधील संग्रामपुर जानाऱ्या आणि येनाऱ्या गाडयांना संग्रामपुर येथील आय टी आय कॉलेज ला थांबा द्या अशी जळगांव जा . शहर आणि तालुक्यातील विदयार्थी आणि पालकांची मागनी आहे .
