• विदर्भ युवा क्रांती संघटनेने घेतला पुढाकार
भंडारा | मनोज चिचघरे
“फडफडते दिव्यांना तेल द्या,आम्हा जीवनदान द्या.”
वर्तमान काळातील वयोवृद्ध त्यांच्या उतारकाळात त्यांचे जगण्याचा हक्क शासनाकडे मागण्याकरिता तहसील कार्यालय पवनी येथे धडक मोर्चा काढण्यात आला.सविस्तर असे की वयोवृद्ध, निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग,विधवा साठी शासनाकडून सुरू असलेल्या योजनांमधून मिळणारा मासिक निर्वाह भत्ता गेल्या चार महिन्यांपासून मिळाला नसल्याने वयोवृद्धांची दयनीय अवस्था झालेली आहे. ही बाब विदर्भ युवा क्रांती संघटनेचे भंडारा जिल्हा संघटक दत्तू हटवार यांच्या लक्षात येताच संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष वाघमारे यांनी 16 जानेवारी 2025 ला प्रशासनाला निवेदन दिले. परंतु संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त एका महिन्याचा भत्ता देण्यात आला. मात्र उर्वरित भत्ते त्वरित देण्याची मागणी लावून धरत संघटनेचे अध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात मोर्चाचे नेतृत्व उरकुडा शिवरकर यांनी केला जगावे की मरावे असं संतप्त प्रश्न योजनांच्या लाभार्थ्यांनी शासनाला विचारत त्यांचा प्रतिक्रिया तहसीलदारांसमोर ठेवल्या. या संपूर्ण मोर्च्याची बांधणी जिल्हा संघटक दत्तू हटवार, तालुका अध्यक्ष संतोष वाघमारे, तालुका उपाध्यक्ष नितेश सोनटक्के, जिल्हा मार्गदर्शक हरिश्चंद्र भाजीपाले, शहर सचिव रमेश आंबोलीकर, जिल्हा संघटक यशवंत देशमुख, तालुका सचिव किशोर सावरबांधे, सामाजिक कार्यकर्त्या माला समुद्रेकर, जिल्हा संघटक श्रावण कांबळे आणि जिल्हाध्यक्ष नीरज तलमले व उरकुडा शिवरकर
यांनी केला.
जेव्हा मोर्चा तहशिल कार्यालयात पोहचला तेव्हा मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले मोर्चेकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तेव्हा निवेदन घ्यायला नायब तहशिलदार श्री प्रमोद राऊत मोर्चा स्थळी आले व सांगीतले की काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ते थांबलेले आहेत परंतु तांत्रिक अडचणी दुर झाल्या की सर्व योजनेचे पैसे लाभार्थी यांचे खात्यात टाकण्यात येतील – प्रमोद राऊत नायब तहसीलदार
दाण्याले आणि दवाई पाण्याले लागतेत पैसे” अशी आर्त हात मोर्चातून येताना दिसून आली. पवनी तालुक्यातील व शहरातील शेकडो निराधार वय वृद्धांचा सहभाग मोर्चाचा मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. जगण्यासाठी असलेली त्यांची तडफड मोर्चात पहावयास मिळाली.
“निराधारांची,वयोवृद्धांची होणार “काठी” – सयुवा क्रांती संघटना”
निराधार वयोवृद्धांना त्यांच्या उतार वयात प्रेमाची आणि आधाराची गरज असते त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळावा, शासकीय कार्यालयात योग्य वागणूक मिळावी आणि मान मिळावा, तसेच त्यांना वेळोवेळी येणारे अडचणीसाठी यासमोर विदर्भ युवा क्रांती संघटना खंबीर उभी राहील. तसेच निराधारांना अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क करा.
हर्षल वाघमारे – अध्यक्ष विदर्भ युवा क्रांती संघटना
