लोकवार्ता न्यूज नेटवर्क
बेलदार समाज सेवा कल्याण समितीतर्फे बालाजी सभागृह येथे बेलदार कापेवार समाज बांधव भगिनींचा स्नेहमिलन कार्यक्रम बालाजी सभागृह येथे आयोजित करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचावर ज्येष्ठ समाजसेविका सौ मीनाताई कुल्दीवार ,प्रमुख अतिथी सौ सुचिताताई भंडारवार ,सौ वनिताताई दमकोंडवार, जेष्ठ वक्त्या सौ सविताताई बोपनवार, सौ सुनीता ताई तेल्लावार ,नंदाताई गांडलेवार ,सौ मनीषाताई कोलावार ,सौ उमा नायडू आदींची उपस्थिती होती. मान्यवरा तर्फे बेलदार समाजाचे प्रेरणास्थान माजी मुख्यमंत्री स्वर्गीय श्री. मा.सा .कन्नमवार यांच्या प्रतिमेस पुष्प माला अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .मान्यवरा तर्फे सौ. मीनाताई कुल्दीवार यांनी “बेलदार समाजाची वर्तमान स्थिती व त्यांना मिळणारे शैक्षणिक आरक्षण यातून कसा विकास साधता येईल” यावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ वक्त्या सौ. सविताताई बोपनवार यांनी “बेलदार समाज संघटन व मेळाव्याद्वारे समाजाची जागरूकता” यावर भाष्य केले
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,कपल गेम, वन मिनिट गेम आदी मनोरंजन कार्यक्रम घेण्यात आले हळदी कुंकू व वाण वितरण करून समाजाचे स्नेह मिलन करण्यात आले ,समितीतर्फे भोजना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली .
कार्यक्रमाचे प्रास्तविक कु. भाग्यश्री नायडू, संचालन सौ .संध्या नेरडवार व आभार प्रदर्शन सौ. ज्योती तोटेवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता समितीचे पदाधिकारी अध्यक्ष श्रीनिवास बुगावार, उपाध्यक्ष उमेश जी कोलावार ,कार्याध्यक्ष श्रीनिवासजी तोटा, सचिव सुनील बोपनवार, सदस्य भास्करराव तेल्लावार, शंकरराव पुलगमवार ,सुरेश नायडू, सुनील बोंतलवार, ईश्वर नेरडवार, सतीश कस्तुरवार, रमेश नायडू ,अशोक नायडू ,राजेश मारशेट्टीवार, गजानन मैदमवार ,रवी कोलावार ,दिनेश कोलावार ,रमेश उद्धरवार ,गणेश तोटेवार साई नायडू ,संजय नेरलवार, पवन बोपनवार, परेश कुल्दीवार ,पर्वत तोटेवार, किशोर पुसलवार ,राजेश कोमटवार ,श्रीराम पत्तीवार, राकेश अडगुडवार, किरीट तिरुपती वार ,साईनाथ झीलकरवार, श्रीनिवास तेरकुटोटावार तसेच सौ. अश्विनी बुगावार ,डॉक्टर सौ प्रेरणा तिरुपती वार, डॉक्टर सौ रेणुका कुल्दीवार ,श्वेता कस्तुरवार श्रि लता पुसलवार, दीपावली दिकोंडवार हेमवती कोमटवार ,शिल्पा नायडू ,संगीता नेरलवार ,सुजाता गडीलवार, पल्लवी दमकोंडवार ,नम्रता दमकोंडवार ,अनिता कोलावार ,शितल कोलावार ,सुधा जीलकरवार ,मीना जिरकरवार ,मीनल झिलकरवार ,बेबीताई दिकोंडवार, सुनीता कस्तुरवार ,कविता बोपनवार, दिपाली नायडू आदींची उपस्थिती होती
