बल्लारपूर : मोहसीन भाई जव्हेरी विद्यालयात दीपप्रज्वलन व भारत माता,महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इब्राहिम जव्हेरी सर लाभले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खान मॅडम, व पर्यवेक्षिका विमल रच्चावार मॅडम या उपस्थित होत्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वर्ग आठविच्या विद्यार्थिनीने लेझीम प्रात्यक्षिक सादर केले तसेच मान्यवरांच्या हस्ते जिल्हा गणित अध्यापक मंडळ चंद्रपूर या गणित संबोध परीक्षेमध्ये वर्ग पाचवी चे दहा विद्यार्थी व वर्ग आठवीचे तीस विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रथम क्रमांक सानवी गजानन कोकोडे तसेच झोया मैबुल खान हिचा द्वितीय क्रमांक आला त्याचबरोबर वर्ग आठवी या गटातून चरित्रा राजू सोयाम हिचा पहिला क्रमांक तसेच अनुष्का नितेश गेडाम हिचा दुसरा क्रमांक आला यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचबरोबर एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान परीक्षा,नागपूर या परीक्षेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या परीक्षेमध्ये वर्ग आठ ते दहा गटांमध्ये सालेव्हा कौसर खान हिचा प्रथम क्रमांक तसेच श्रेया मोरेश्वर पारेकर व हुमेरा शमशुद्दीन शेख हिचा दुसरा क्रमांक आला आहे तसेच पाचवी ते सातवी या गटातील तृप्ती अनिल पिंपळकर हिला प्रथम क्रमांक तसेच अनुष्का सचिन सोपनकर व परि मनोज सिडाम हिचा दुसरा क्रमांक आला आहे. यांना प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
