• लाखो रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान
लोणार (बिबि) | भागवत आटोळे
हंगामाच्या तोंडावर अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी टाकलेल्या मोटार पंप चोरून नेले तसेच काही मोटर पंपा मधील तांब्याची बाहेर काढून नेऊन मोटारींची नसधूस केली. यामध्ये जवळपास 17 ते 18 शेतकऱ्यांच्या मोटार पंपांना अज्ञात चोरट्यांनी 29 डिसेंबरच्या मध्यरात्री चुना लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून, खूप मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहकर तालुक्यातील बोराडी जलाशयामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोटार पंप टाकलेले आहेत. यातील धरणाच्या साडव्याच्या काठावरील मोटार पंप अज्ञात चोरट्याने 29 जानेवारीच्या मध्यरात्री चोरून नेले आहे. काही मोटारींची तोडफोड करून त्यामधील तांब्याची तार काढून नेली. यामध्ये रामेश्वर देवकर, मनोहर देवकर, गजानन जेठे, रमेश देवकर, मोहन देवकर, बद्रीनाथ देवकर, मनीष धोंडगे, दत्तात्रय देवकर, लक्ष्मण मगर, अश्रू देवकर, प्रवीण धांडे, रामकिसन राऊत, सुरेश देवकर, दिगंबर बळी, लक्ष्मण देवकर, हरिश्चंद्र बाबडे, रामदास देवकर आदी शेतकऱ्यांच्या मोटारींची नासधूस मोटार मधील तांब्याची तार काढून नेल्यामुळे खूप मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या अज्ञात चोरट्यांचा शोध घ्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. या चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन मेहकर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. आता ठाणेदार भाऊरावजी घुगे या चोरट्यांचा शोध लावतील का? की, अगोदर ही अशा घटना घडली आहे. शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या परंतु त्या दोन दिवसापुरता तपास केला आणि त्यानंतर पुन्हा प्रकरण थंडावले अजूनही अगोदर येईल चोरट्यांचा शोध लागला नाही. की, पोलीस या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कमी पडले. का पोलिसांचा हात यामध्ये आहे अशा प्रकारची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे.
मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला याची संपूर्ण जाणीव असून, या अज्ञात चोरट्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळू. जर कोणाला कोणावर काही संशय असेल तर शेतकऱ्यांनी आम्हाला सांगावे.
-भाऊरावजी घुगे,ठाणेदार मेहकर पोलीस स्टेशन
दरवर्षी अशा चोरीच्या घटना घडतात परंतु याचा तपास अद्यापही लागला नाही. याच प्रकल्पातून शेवगा जहागीर, देऊळगाव माळी, हिवरा आश्रम, पिंपळगाव उंडा, या गावातील शेतकऱ्यांच्या मोटर पंप तीन महिने अगोदर चोरून होते. ही घटना ताजी असताना परत अशाच प्रकारची घटना घडली त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू आहे का? का पोलीस तपास करण्याचे नाटक करीत आहेत. जर प्रशासनाने ठरवलं तर पूरलेला मुडदा सुद्धा उकरून त्याचा शोध तर अशा घटना त्यांच्या भाई काहीच नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
