बिबि | भागवत आटोळे
किंनगाव जटुटु येथील जि.प .मराठी प्रायमेरी कन्या शाळा बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. या बाल आनंद मेळावा साजरा करण्याचे उदिष्ट विद्यार्थ्यांना मनोरंजनातून गणीत कळावे व विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे हा या बाल आनंद मेळाव्याचे उदीष्ट होते या बाल आनंद मेळावा मध्ये लहान लहान मुलींनी वेगवेगळे खाद्य पदार्थ आनले व आलेले ग्राहकांशी कशाप्रकारे व्यावहार करायच याचे ज्ञान मुख्यध्यापक पवार सर ,शिक्षक,काकड सर,कु.दिघेकर मॅडम,व कु.डोंगरे मॅडम यांनी दिले. याप्रसंगी गावचे सरपंच पुत्र निलेश महाजन , सदश्य अनीस खाॅ पठान, पत्रकार सय्यद जहीर,शाळा समिती अध्यक्ष नारायण राऊत, उपाध्यक्ष सचिन मुळे , सदस्य तौफीक भाई, अंकुश आडे, व इतर सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे, मनोरंजनातून गणित कळावे हा या मागचा हेतू. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, शिक्षक काकड सर , कु.दिघेकर मॅडम व कु. डोंगरे मॅडम यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच किनगाव जट्टू केंद्राचे केंद्रप्रमुख मा. गजानन कायंदे सर यांनी सुद्धा बाल मेळाव्याला भेट देऊन सर्वाना मार्गदर्शन केले.
