• निवेदनातून येल्लापुर येथील नागरिकांनी केली जिल्ह्या आधीकार्यांना विनंती
जिवती – तेलंगणा सिमेलगत असलेल्या येल्लापुर ग्रा.प येथे गाव बसले तेव्हा पासून गावात पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे.पाणी हे जिवन आहे आणी पाण्यावीना माणसाचे जिवन जगने शक्य नाही हे सत्य आहे. मात्र येल्लापुर येथे फेब्रुवारी, महिना लागण्यापूर्वीच पाण्याची पातळी बुडाला टेकली आहे. येणाऱ्या एप्रिल ते मे, पर्यंत पाण्यावाचुंन गावातील नागरिक बाहेर गावी जाण्याच्या तयारीत आहेत. शासनाने कोठ्यावधी रुपये खर्च करून जलजीवनचेमिशन चे काम येल्लापुरात केले आहे, मात्र कामाचा बड्याबोळ झालेला आहे. जलजिवन अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. मात्र टाकिला आतापासूनच गळती लागली आहे. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करीत आहेत. बैलपोळ्याला जसा बैल सजवतात तसे टाकिला कलरपेंट मारुंन गळत्याटाकिचे बिल काठ्यांसाठी कंत्राटीदार चाणक्य नीती चालवन्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र यावरती गावकरी गांभीर्याने पाण्याचा जिवन आधारित विषय असल्याने गावातील सरपंच, उपसरपंच, तथा. सदस्य. व. तंटामुक्त, अध्यक्ष, व गावातील नागरिकांनी पाण्याच्या समस्याना घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी यानि निवेदनाद्वारे विनंती केली आहे.कि येल्लापुर मध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने तात्काळ पाण्याचा विषय मार्गी लावा सोबतच पाणिपुर्वठा अधिकारी यांची सुध्दा गावकर्यानि जलजिवनमिशन च्या कामासंदर्भात तक्रार करुन कामवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे.पाण्याचा विषय मार्गी लावण्यात संबंधित विभाला अपयश आले नसुन कंत्राटीदाराच्या बेशिस्तीमुळे येल्लापुर येथिल जलजिवनमिशनचे काम परिपूर्ण व चागले झालेले नसल्याचा सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष तथा गावातील नागरिकांनी आरोप पाणिपुर्वठा अधिकाऱ्यांसमोर तक्रार केली आहे.
येल्लापूर येथील जलजिवनमिशनचे काम पाहाण्याकरीता मि स्वता येणार आहे व मि सोबत संबंधित कंत्राटिदारांना सुद्धा उपस्थित राहण्यासाठी कडक आदेश देणारं व गावातील जलजिवनमिशनचे काम बारकाईने पाहुंन अपुर्ण काम परिपूर्ण व चांगल्या दर्जाचे काम कंत्राटदाराला करण्याचे आदेश देईल येणाऱ्या पाच ते सहा दिवसात मि येल्लापुरला भेठ अवश्य देनार आहे व्यक्तीकरीत्या तुमचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुर्णताकतिने काम करेल – हर्ष भोवरे -ग्रामीण पाणीपुरवठा आधीकारी चंद्रपूर
गावामध्ये एकमेव पिण्याच्या पाण्यासाठी शोर्य-स्तंभाजवळील गावाच्या काठेला विहीर आहे मात्र ते विहिरही आर्धि कोसळली आहे व, एप्रिल ते मे प्रयत्न पाण्यावाचून जनावरे कुत्रे मरतात हे दुर्दैवि बाब आहे माणसांचे बेभान हाल होतात काहिक नागरिक गावातील पाण्याच्या टंचाईमुळे चार ते पाच महिने गाव सोडून बाहेर गावी राहतात पाण्याची सर्वात मोठी समस्या असल्याने गावातील माय बाप जनतेच्या वतिने आमदारना विनंती करतो कि आमचा पाण्याचा सोडवावा आणि आम्हाला राहत द्यावी.
