संपूर्ण गावात शोककळा: अरततोंडी/दाभना येथील घटना
गोंदिया | मनोज चिचघरे
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथील दोन चुलत भावांचा गावाच्या शेजारील असलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रितिक पातोडे व दुर्गेश पातोडे अशी मृत मुलांची नाव आहे.
रितिक व दुर्गेश गावातील जिल्हा परिषद शाळेत सातवीला शिकत होते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने दोघेही फिरता फिरता गाव तलावाजवळ गुरांना धुण्यासाठी गेले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करून असून,या घटनेमुळे संपूर्ण गावात पसरली शोककळा पसरली पसरली आहे.
