आंबेडकरी चळवळीतील नेते
पॅंथर गंगाधरजी गाडे साहेब, यांच्या जाण्याने समाजाची कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. साहेबांच्या आक्रमकते मुळेच येथील बहुजन, शोषित, वंचित पिढीत्यांची पाळं मूळ घट्ट होत गेली, बहरली, सुखाची फळ चाखायली. साहेबांनी केलेलं कार्य त्यांनी केलेला संघर्ष हा कोणीही नाकारू शकत नाही. विदर्भातून आलेल्या या पॅंथरणे आयुष्यभर समाजाला न्याय देण्याचं काम केलं. आपल्यातील नेतृत्व कौशल्याने समाजातील अनेक तरुणांना घडवले समाजातील अनेक नेते साहेबांच्या छत्रछायातच वाढले, मोठे झाले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर लढण्यासाठी हा पॅंथर सदैव पुढे असायचा. राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ उभारून आयुष्यभर या केलेल्या कार्यामुळे सदैव समाज मनात घर करून राहील.
आज सकाळी 4.30 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच रविवारी 4 वा. अंत्यविधी केला जाणार आहे.
