जळगांव जामोद – बांगलादेश मध्ये हिंदु बांधवांवर होत असेलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज दी २० / ४ /२०१४ रोजी जळगांव शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला . शहरासह तालुक्यातील सर्व हिंदु बांधवांनी बांगला देश मध्ये हींदुबांधवांवर होत असलेला अत्याचार थांबावा या बाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माननिय राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले .यावेळी सर्वच राजकीय पक्षातील हींदु बांधव उपस्थीत होते . तसेच जळगांव जामोद पोलीसांनी बंदोबस्त चोख ठेवला होता .
