राजेश ढोले/ विदर्भ यवतमाळ
“2 जिवंत काडतुस सह 32,000 रुचा माल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई“
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 17/01/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, मौजे खंडाळा फाटा येथे एक इसम ज्याने अंगात राखाडी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेले त्याचेकडे एक गावठी बनावटीची देशी पिस्टल असून तो खंडाळा फाटा येथे थांबला आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थागुशा पथक तात्काळ पंचासह खंडाळा फाटा येथे रवाना होवून संशयीत इसम यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सैय्यद समीर ऊर्फ बाबू सैय्यद कलंदर वय 29 वर्ष, रा. काझीपुरा अनसिंग ता. जि. वाशिम असे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ गावठी बनावटीचा देशी पिस्टल किंमत अंदाजे 30,000/- रु तसेच दोन राऊड (काडस्तुस) किंमत 2000/- रु असा एकूण 32,000/-रु माल मिळून आल्याने तो जप्त करुन ताब्यात घेवून नमूद इसम यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन खंडाळा येथे अप. क्रमांक 17/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री. हर्षवर्धन बी.जे.सा, मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
