घुग्घुस: नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात रविवार, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली.
यावेळी माजी जि.प. सभापती नितु चौधरी, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी, अमोल थेरे, शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, दिनेश बांगडे, चिन्नाजी नलभोगा, हेमंत पाझारे, माजी ग्रामपंचायत सदस्या पुजा दुर्गम, सुचिता लुटे, लक्ष्मी नलभोगा, नंदा कांबळे, सुरेंद्र जोगी, गंधर्व भगत, प्रेमलाल पारधी, दिलीप कांबळे, सुरेंद्र भोंगळे, अण्णा कदम, मुज्जू लोहाणी, विशाल नागपुरे, संदेश पोलशेट्टीवार, मंदेश्वर पेंदोर, गणेश झाडे, सिनू कोत्तूर, अनिल नित, पांडुरंग थेरे, सुनील राम, अमीना बेगम, आबेदा पठाण, सुनीता पाटील, उषा आगदारी, उज्ज्वला उईके, जनाबाई निमकर, माया मांडवकर व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.
