आगीत जळून तीन मजूर गंभीर जखमी : कामगारांच्या सुरक्षेकडे कंपनीचे दुर्लक्ष
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
घुग्घुस पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धबली इस्पात (ओमेट स्टील) कारखान्यात रात्रीच्या वेळेस भट्टीजवळ झालेल्या भीषण स्फोटात तीन कामगार भाजले असून, या घटनेनंतर कंपनीतील कामगार अचानक जागे झाले. ओरडण्याच्या आवाजाने घाबरले आणि बाकीचे कामगार त्यांना वाचवण्यासाठी धावले अपघाताची माहिती होताच कंपनीचे व्यवस्थापन व सुरक्षा कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले व कसेबसे कामगारांची सुटका केली व तिन्ही कामगारांना तातडीने चंद्रपूरचे डॉ. कुबेर रुग्णालयात दाखल केले. या घटनेतील एका मजुराची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर डॉ. कुबेर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या मजुराची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. एक मजूर स्थानिक मजूर आहे आणि इतर दोन मजूर हे एमपी, यूपी किंवा इतर प्रांतातील असल्याचे सांगितले जात आहेत. सिकंदर यादव (वय 35) रा. यूपी, गाझीपूर, लल्लन वर्मा (25) रा. म.प्र., निखिल वाघाडे (32) रा. चंद्रपूर, चिचाळा. तिन्ही मजुरांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. स्फोटातून ज्वाळा आणि गरम साहित्य उडून कामगारांच्या अंगावर पडले यात त्याठिकाणी काम करणारे तिन्ही मजूर गंभीररीत्या भाजले असून, आगीत भाजलेल्या तिन्ही मजुरांना कुबेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार यांनी दवाखान्यात पूर्ण उपचार करण्याचे आश्वासन दिले. मात्र परप्रांतीय मजुराचे एकही कुटुंब अद्याप दवाखान्यात पोहोचले नसल्यामुळे कारखान्यातील सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्यानेच वारंवार असे अपघात होत आहेत.
कंपनीतील अपघातात आतापर्यंत अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे असा संशय कामगारांनी व्यक्त केला आहे. अनेक कामगारांना पाय तर काहींना हात गमवावे लागले आहेत. कारखाण्यात होणारे अपघात टाळण्यासाठी कंपनीत सुरक्षित कामाचे सेफ्टीचे साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे, तसेच कर्मचाऱ्यांना योग्य उपकरणे व नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे. आणि कामगारांना अपघातानंतर कंपनीतील व्यवस्थापन वारंवार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात. ज्याची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली जात नाही. सिद्धबली इस्पात (ओमेट स्टील) कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार हे पोलीस प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
