चंद्रपूर : रुपेश निमसरकार
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितरित्या फिरणाऱ्या तीन व्यक्तींना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता रामनगर तसेच भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याचे कबूल करून आरोपीकडून सराफा दुकानदाराला विकलेले 3,71,000 रुपयांचे सोने – चांदीचे दागिने जप्त केले आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना रयतवारी कॉलरी येथे रेकॉर्डवरील आरोपी संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली यावरून पथक घटनास्थळी दाखल होत राकेश सुब्रम्हण्यम सानिपती ((34) रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर, विश्वजीत सकदर (32) रा. बंगाली कॅम्प व दिपक भोले (21) रा. शांतीनगर बंगाली कॅम्प चंद्रपूर या तिघांना ताब्यात घेत पोलीसीखाक्या दाखवताच तिघांनीही भद्रावती तसेच रामनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे कबूल केले आणि सोने चांदीचे दागिने सराफा व्यावसायिक मनोज पवार यांना विक्री केल्याचे सांगितले यावरून सराफा व्यावसायिक तसेच आरोपीकडून सोने चांदीचे दागिने असा एकूण 3,71,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीना पुढील तपासाकरिता रामनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदर आरोपीविरुद्ध रामनगर, चंद्रपूर शहर व दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे चोरी, घरफोडी अश्या प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोहवा. सतिश अवथरे, संतोष येलपुलवार, गोपीनाथ नरोटे, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
