तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी तालुका पोंभुर्णाच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पोंभूर्णा तालुक्यातून जाणारा समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे.
पोंभूर्णा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 30984 हेक्टर असून खरीप पिकाखालील 19642.49 हेक्टर व रब्बी पिकाखालील 8070 हेक्टर क्षेत्र आहे. एकूण पिकाचे क्षेत्रापैकी 12830 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आहे. पोंभुर्णा तालुक्यातून जाणारा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करून त्याबाबतची अधिसूचना काढावी. या मागणीचे निवेदन अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी तालुका पोंभुर्णा च्या वतीने करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र निवडणूक होताचं हा महामार्ग पूर्ण करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील महामार्ग रद्द करण्यात यावा व त्याबाबतची अधिसूचना काढावी अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या वतीने केली आहे. महामार्ग रद्द न केल्यास त्याची कोणतीही मोजणी होऊ दिली जाणार नाही. असा इशारा अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीने यावेळी दिला आहे.
