एटापल्ली : तालुक्यातील नागूलवाडी येथील नव महाराष्ट्र क्लब नागूलवाडी यांच्या वतीने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेची आयोजित केले आहे.या कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
कब्बड्डी अ’गटसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक समस्त गावकरी मंडळ कडून तसेच तृतीय पारितोषिक बी.पी.तोरेम सर,करमे सर जिल्हा परिषद शाळा नागूलवाडी कडून देण्यात येत आहे.
कब्बड्डी ‘ब’गटसाठी आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून द्वितीय पारितोषिक नव महाराष्ट्र क्लब नागूलवाडी मंडळकडून तृतीय पारितोषिक प्रज्वल नागूलवार कडून देण्यात येत आहे.
व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ग्रामपंचायत नागूलवाडी कडून द्वितीय पारितोषिक नागूलवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एन.आय.मडावी कडून तृतीय पारितोषिक माजी सरपंच मुन्नीताई दुर्वा,रमेश वैरागडे कडून देण्यात येत आहे.या कार्यक्रमचे सहउदघाटक व अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी आणि नागूलवाडीचे पोलीस पाटील माधव गावडे हे होते.
यावेळी नीता दुर्वा,ज्योती हलमी,रमेश हलमी,सपना मट्टमी,उर्मिला हलमी,गणेश दुर्वा,उमेश गावडे,सागर दुर्वा,राहुल हलमी,सुजल गावडे,विलास,रुक्षव दुर्वा,दीपक हलमी,नरेश हलमी,किशोर हलमी,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील क्रीडा प्रेमी तसेच स्थानिक कार्यकर्ते,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
