बल्लारपूर. ता.१९ : मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती, आज बुधवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘संताजी भवन’ येथे संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती.
संत.श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संताजी भवन येथे पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश बेले, उपाध्यक्ष श्री. सुधाकर घुबडे,सचिव श्री राजेश खनके,कोषाध्यक्ष मोहन कळंबे, सहसचिव अनिल ढोक, ज्ञानेश्वर कामडी, किसनराव लोहबडे, प्रभाकर कवलकर, मोनीश खनके,निखिल घुबडे,पलाश कवलकर, लोमेश वैरागडे, श्री.बुटले, अविकांत नरड, दीपक सातपुते, दिनकर शेंडे सौ. संध्या हजारे, कु. कल्याणी पोहाणे यांच्यासह संत श्री संताजी सेवा मंडळाचे कार्यकारी मंडळ, युवक, युवती, महिला मंडळासह शेकडो समाज बांधवांची उपस्थिती होती.
