घुग्घुस: भाजपा घुग्घुसतर्फे रविवार, २६ जानेवारी रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बौद्ध बांधवांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते भोजनदान करण्यात आले. याप्रसंगी मोठया संख्येत बौद्ध बांधवांनी भोजनदानाचा लाभ घेतला.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे अमोल थेरे, दिनेश बांगडे, गणेश कुटेमाटे, बबलू सातपुते, सुनील बाम, चिन्नाजी नलभोगा, प्रमोद भोस्कर, हेमंत पाझारे, संजय पडवेकर, मारोती मांढरे, सिनू कोत्तूर, कोमल ठाकरे, असगर खान, धनराज पारखी, हेमंत कुमार, बंटी आगदारी, संदीप तेलंग, सुनंदा लिहीतकर आदींची उपस्थिती होती.
