जनता विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा
ध्वजारोहण मुडे सर यांच्या हस्ते
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव
पोंभुर्णा : ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्राध्यापक मुडे सर यांच्या हस्ते जनता विद्यालयात तथा कनिष्ठ महाविद्यालय पोंभुर्णाच्या पटांगणावर पालक शिक्षक समिती , शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी, पालक वर्ग, विद्यार्थ्यांच्या व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कु. क्रिष्णाई कोहरे,यश खोब्रागडे,हेमा लोणारे, या तिघांनी दुसऱ्यांना हेवा वाटावा असे सुंदर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य/मुख्याध्यापक अमरसिंह बघेल होते प्रमुख पाहुणे: बबनराव गोंरतवार माजी सरपंच तथा उपाध्यक्ष पालक शिक्षक समिती, चरणदास गुरनूले उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,जमनादास गोवर्धन माजी सरपंच,उरकुडे शाळा पर्यवेक्षक,मुडे सर,भसारकर ,हेमाताई बुरांडे , बबिताताई वाकळे , इवंदर गेडाम, दिपक उराडे, किशोर कानमपल्लीवार, मिलिंद गोवर्धन तथा पालक वर्ग उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून देशाला २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आणली , सर्वाना मतदानातून निवडण्याचा हक्क दिला,सर्वांना स्वतंत्र जगण्याचा मुलभूत अधिकारी दिला म्हणून २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिन साजरा करतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे व शेतकरी हा पोसिंदा आहे, त्या प्रमाणे तुम्ही विद्यार्थी सुध्दा भारत देशाचा कन्ना आहात, तुम्हच्या हर क्षेत्राच्या कर्तृत्ववाने भारतात तुम्हची खरी ओळख असणार आहे ,आई वडिलांनची खरी संपत्ती मुलं बाळ असतात, त्यांना ठेच पोहचेल अशी कोणतेही कृत्य करू नका. समोर फेब्रुवारी महिन्यात १०व १२वी ची परीक्षा आहे, बोर्डाने नविन नियमानुसार परिक्षा केंद्रावर केन्द्र संचालक, पर्यवेक्षक व स्टाफ दुसऱ्या शाळेचा असणार आहे. घाबरून न जाता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून आपला,आई वडीलांचा गुरुचा व जनता शाळेचा नाव मोठे करा.जुन्या इतिहासाला उजाळा देत विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तरे विचारत क्रिष्णाई कोहरे हिंदीतून झालेल्या भाषणाचा कौतुक करत असा मोलाचं मार्गदर्शन बबनराव गोंरतवार यांनी केले.
चरणदास गुरनूले व हेमाताई बुरांडे यांनी थोडक्यात मार्ग दर्शन केले. जनता कान्व्हेटच्या छोट्या मुला मुलींनी देशावर आधारित खूप सुंदर नृत्य सादर केले. वर्ग ७वी , वर्ग ८वी, वर्ग १० वी, वर्ग ११वी या सर्व वर्गातील मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनाही केलेल्या कलागुणांची पावती म्हणून शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणातून बघेल यांनी मोलाचे मार्गदर्शन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना कु. समृदा वाकळे यांनी केली, सुत्रसंचालन माथनकर यांनी केले,मान्यवरांचे आभार पेंटेवार यांनी मानले व पालक वर्ग, शिक्षक वृंद तथा कर्मचारी उपस्थित होते.
