▪️माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे तहसीलदारांना निवेदन
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
जिल्ह्यात कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव झालेला नाही मात्र जिल्हाभरात अवैद्य वाळूचा उपसा व वाहतूक होतांना वास्तव चित्र पाहायला मिळते आहे. जिल्हाभरात अनेक शासकीय कामे केली जात आहेत. त्याठिकाणी मात्र वाळूचे ढिगारे असून बांधकामे होतांना दिसत आहेत.
या गोरखधंद्या विरोधात पोंभुर्णा तालुक्यातील माहिती अधिकार व पत्रकार सरक्षण समितीने पोंभुर्णा तालुक्यात खालील वाळू घाटातून होत असलेल्या अवैद्य वाळू तस्करी विरोधात पोंभुर्णा तहसीलदार यांना निवेदन देऊन अवैद्य वाळू तस्करी बंद करण्याची मागणी केली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव, जुनगाव, देवाडा खुर्द, वेळवा, नदी पात्रातुन रात्री अपरात्री सर्रासपणे अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत आहे. नदी पात्रात अवैधरीत्या रेतीचे उत्खनन होत असल्याने नदी कोरडी पडून पाणीपुरवठा योजनेला जोरदार फटका बसत आहे, अवैध रेतीची वाहतूक गावांमधून भरधाव वेगाने होत असल्याने ट्रॅक्टरच्या आवाजाने गावातील लोकांची झोप उडाली जात आहे, नदी घाटातुन अवैध उत्खनन होत असल्याने शासनाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होताना दिसत आहे. या नदी घाटाचा लिलाव मागील अनेक दिवसापासून रखडला असल्याने वाळू माफीयांना अधिकचा वाव मिळून खुलेआम वाळूची वाहतूक होताना दिसत आहे. याकडे स्थानिक प्रशासन या गंभिर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. असे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने वैनगंगा नदी व अंधारी नदी पात्रातून अवैध वाळूचे उत्खनन लक्ष देवून बंद करण्यात यावे, असी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. तदवतच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती यांच्याकडू सुध्दा सदर अवैध वाळूचे उत्खनन बंद करण्यात यावे. अन्यथा समितीच्या माध्यमातून नाईलाजास्तव आआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
