• समाजासाठी” कुणी बांबू देता का बांबू ” ची आर्त हाक – महेश रामराव बोरकर, सामाजिक कार्यकर्ता
भंडारा | मनोज चिचघरे
हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना वापरून तयार करण्यात येणारे टोपली, सुप, बेंडवा, परडा, थाटरा व ढोली बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बुरुड व आदिवासी समाज बांधव, काही महिन्यापासून बांबू पुरवठा बंद /न मिळाल्यामुळे बेरोजगार झालेले आहेत.
पवनी तालुक्यात जवळ पास बुरुड / आदिवासी 500 कुटुंब परंपरागत व्यवसाय करून आपला जीवनाचा गाडा ओढत असतात. विविध मानवोपयोगी आपली उत्पादने सूर्य निघण्याच्या अगोदर आठवडी बाजार परिसरात तसेच खेडोपाडी विकून अर्थाजन करत असतात. यातच कधी बांबूचे दर गगनाला भिडल्यामुळे तर कधी वन विभागाच्या / शासनाच्या भोंगळ कारभारामुळे उदरनिर्वाह साठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाच्या कचाट्यात सापडलेला असल्याची माहिती बुरुड सामाजिक कार्यकर्ते महेश बोरकर यांनी सांगितले.
बुरुड व आदिवासी कुशल परंपरागत कारागीर म्हणून वारंवार निवेदन दिले पण इथे ” परसाला पान तीनच ” अशी अनुभूती नेहमीच येते. नाईलाजास्त्व खाजगी शेतीतील बासाची दुप्पट भावाने खरेदी करून पोटाची भूक शांत करावी लागते. बुरुड समाजाच्या दश्या व दिशा याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. नाहीतर ही अवस्था झाली नसती.
बांबू (बास) ची गरज व उपयोगिता बघता बांबू (बास ) पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे तसेच बांबू तोड मजुराचे मजुरीचे पैसे त्वरित द्यावे. व वन विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन पुरवठा नियमित करावा. अन्यथा बुरुड समाजाकडून तीव्र आंदोलन तालुक्यात करण्यात येईल असे मत सामाजिक बुरुड कार्यकर्ते महेश बोरकर यांनी केली आहे.
बांबू एक बहुउपयोगी परिपूर्ण वृक्ष असून याचा उपयोग बुरुड समाजाच्या उदरनिर्वाहसाठी होत असून मनुष्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे समाजाची वन वन होत आहे. यात लवकर तो योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी – महेश बोरकर, बुरुड सामाजिक कार्यकर्ता
