शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन
सामोडे प्रतिनिधी सामोडे ग्राम पंचायत च्या उपसरपंच पदी युवा कार्यकर्ते रावसाहेब सिताराम घरटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा पिंपळनेर मंडळ कोषाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार दिलीप घरटे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा चे निष्ठावान कार्यकर्ता निकेशभदाणे मोहन घरटे उपस्थित होते.
रावसाहेब घरटे हे माजी पंचायत समिती सदस्य असुन आत्ता ग्राम पंचायत मध्ये बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली होती आता उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली रावसाहेब घरटे हे माजी जि प अध्यक्ष मा शिवाजी राव दहिते व जि प सभापती व युवा नेते हर्षवर्धन दहिते यांचे विश्वासू सहकारी मानले जातात त्याच्या निवडीबद्दल सामोडे गावात स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे रावसाहेब घरटे यांचे काका श्री केशव दाजी घरटे हे सुद्धा उपसरपंच होते तसेच चुलत भाऊ मुकुंद केशव घरटे हे पण उपसरपंच होते आत्ता रावसाहेब घरटे यांना उपसरपंच होण्याचा मान मिळाला सामोडे गावात प्रथम च हा योगायोग आला एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना उपसरपंच पदी निवड झाली आहे.
