भामरागड : तालुक्यातील मडवेली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सिपणपली येथे नवीन अंगणवाडी इमारती बांधकामाचे भूमीपूजन आज आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
यावेळी मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मलेश तलांडे,उपसरपंच परमेश मडावी,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मडावी,पेसाअध्यक्ष काशिनाथ मडावी,गाव पाटील दोलत पेंदाम,भुमिया तुरेज पेंदाम,नरेंद्र गर्गम,शामराव सडमेक,प्रभाकर मडावी,चिनू सडमेक,महेश अलोणे,अमोल अलोने,राहुल गर्गम,तशू शेख,रमसू वेलादी,बचू पेंदाम,गणपती सड मेक,शामराव आत्राम,संभा पेंदांम,ईश्वर आलम,लचू मडावी,मुसली कोरेत,संदीप आत्राम,शामराव सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह मडवेली,सिपणपल्ली गावातील समस्त नागरिक तसेच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
