जळगांव जा. दिनांक – ९ / ११ / २०१४ रोजी जळगांव जामोद ते माकोडी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन धुपेश्वर माकोडी पालखी सोहळा समर्थ रामदास स्वामी संप्रदायातील सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज यांचे पट शिष्य श्री हरी महाराज श्रीक्षेत्र माकोडी तालुका मोताळा यांचा चातुर्मास समाप्ती सोहळा कार्तिक शुद्ध बारस दि.13.11.24 बुधवारी आयोजित केला असून त्यानिमित्त जळगाव जामोद येथून पालखी यात्रेचे आयोजन केलेले आहे श्रीराम मंदिर अयोध्या नगर येथून दि.9.11.शनिवारी संध्या.4 वाजता नगर परिक्रमे करिता पालखी प्रस्थान होईल धनगर पुरा चौभारा मेन रोड ओंकारेश्वर मंदिर सिनेमा रोड दुर्गा चौक राजा भर्तृहरीनाथ मंदिर मार्गाने श्री गजानन महाराज मंदिर योगीराज नगर येथे पालखी मुक्काम आहे.रविवारी दि.10.11 ला महासिद्ध महाराज मंदिर श्री क्षेत्र धानोरा श्री सुपो महाराज मंदिर पळशी सुपो श्री मच्छिंद्रनाथ महाराज मंदिर वडोदा यांचे दर्शन घेऊन श्री अंबिका व भवानी माता मंदिर सिनफाटा येथे पालखी मुक्काम राहील. दि. 11.11 सोमवारी तालखेड ,भोटा मार्गे छोटा हनुमान मंदिर पिंपराळा ,श्रीधुपेश्वराचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पान्हेरा येथे पालखी मुक्कामी राहील. दी. 12.11 मंगळवारी घिर्णी बेलाड येथे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन श्री सात बळेश्वर शिवमंदिर दाताळा येथे पालखी पोहचेल.श्री चैतन्य राम मंदिर श्रीक्षेत्र माकोडी येथे पालखी मुक्काम राहील. दि.13.11 बुधवारी होम हवन श्रीहरी महाराज दर्शन व प्रवचन भजन कीर्तन हरीहट कार्यक्रमात भाविक सहभागी होऊन महाप्रसादानंतर पालखी वाहनाने जळगावला परत येईल.
पालखीत सहभागी होणाऱ्या भाविक बंधू भगिनींनी आपली नावे श्रीराम उपासना मंडळाचे श्री भगवान भाऊ अतकरे मो.न.7767945497, सुरेश गोंड, पांडुरंग मस्के मो.न. 9763048256, प्रमोद मिरगे निलेश काचकुरे मंगेश बावस्कर निवृत्ती कलमकार दशरथ बोंबटकार प्रकाश दंडे विष्णू कवळकर महादेव हिस्सल प्रमोद येऊल,भिका भाऊ मिसाळ, सौ.सुरेखा हिस्सल, लीलाबाई कोथळकर मो.न..9673536197यांच्याकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.