भंडारा | मनोज चिचघरे
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात एसटी बस स्टॅन्ड समोर ट्रकच्या धडकेत स्कुटी सवार आंबेडकर वॉर्ड तुमसर निवासी कौशल्या रुद्दीर डहाट वय 48 ही महिला जागीच ठार झाली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार घटना आज दिनांक 17 जानेवारी दुपारी 12:30 ची असून सदर महिला ही आपल्या स्कुटी क्रमांक MH36 AN 1510 ने बस स्टँड समोरून जात असताना तिला ट्रक क्रमांक MH 36 आज 1700 ने जबर दिली. धडक एवढी जबर होती की सदर महिलेच्या जागीच मृत्यू झाला. सदर महिलेच्या शवाला स्थानिक उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरिय तपासणीसाठी हलविण्यात आले. मृतकाच्या मुलाच्या फिर्यादी वरून तुमसर पोलिसात आरोपी ट्रक चालक इमरान इकबाल शेख वय 30 राहणार डब्बेटोला तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया याच्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस स्टेशन तुमसर चे एपीआय किशोर घोडेस्वार व पोलीस हवालदार गाढवे पुढील तपास करीत आहे.
