▪️पोंभूर्णा तालुक्यातील तांबा गुंडाळणार
▪️स्थानिकांना रोजगार मिळण्याची आशा मावळतीला
▪️वेदांता लिमिटेड कंपनीला मिळाली लिज
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
पोंभूर्णा तालुक्यातील ठाणेवासना परिसरात तांब्याचे साठे असल्याचे आढळून आले आहे. काॅपर ब्लाॅक भारतीय बहुराष्ट्रीय खाण क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेली वेदांता लिमिटेड कंपनीला ठाणेवासना येथील काॅपर ब्लाॅकची लिज देण्यात आली. कंपनीने प्राथमिक स्तरावरचे तांबा शोधण्याचे काम ठाणेवासना येथील तांब्याचा डोंगर व आजुबाजूच्या गाव परिसरात सुरू केले. साधारण सहा महिने तांब्याचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू होते.मात्र एकाएकी कंपनीने भुगर्भातील तांबा तपासणी व नमुने गोळा करण्याचे काम कमी केल्याने अनेक चर्चेला उधाण आले आहे.ठाणेवासना येथील कंपनीचे काम कासवगतीने असल्याने परिसरातील बेरोजगार युवकांना कंपनीत रोजगार मिळेल की नाही हि आशा आता मावळत चालली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पोंभूर्णा तालुका वनवैभवाने नटलेला असून अंधारी व वैनगंगा नदी तालुक्याला वरदान म्हणून लाभले आहे.तालुक्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.या संबंधाने जिओलाॅजी ॲण्ड मायनिंग आणि भारतीय भुवैज्ञानिक सव्हैक्षण यांच्या मदतीने ठाणेवासना येथील परिसरातील जमीनीत प्राथमिक संशोधन करण्यात आले.संशोधनात ठाणेवासना ब्लाॅकमध्ये ८.०२ दशलक्ष टन तांब्याचा साठा मिळाला असल्याचे दिसून आले.स्थानिक प्रशासनाच्या अहवाला अंतर्गत शासनस्तरावरून प्रास्पेक्टींग व खाणकाम करण्यासाठी लिजची निवीदा काढण्यात आली होती. यात भारतीय बहुराष्ट्रीय खाण क्षेत्रातील अग्रगण्य असलेली कंपनी वेदांता रिसोर्रेसेस लिमिटेड या कंपनीला प्रास्पेक्टींग व खाणकाम करण्यासाठी ठाणेवासना काॅपर ब्लाॅकची लिज देण्यात आली. एवढेच नव्हे तर शासनस्तरावरून ठाणेवासना परिसरातील ७६८.६२ हेक्टर एवढी जमीन वेदांता रिसोर्सेस लिमिटेडला ५० वर्षासाठी वाटप करण्यात आली आहे.तसेच कंपनी सुद्धा अधिकची जमीन संपादन करणार होती.त्यामुळे या प्रकल्पातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार होती.पण अचानक कंपनीने ठाणेवासना येथील आपले काम कमी केले असल्याने.सदर प्रकल्प सुरू होणार की नाही या शंकेने बेरोजगारांना चिंता सतावत आहे.या प्रकल्पातून स्थानिकांना मिळणारी रोजगाराची संधी आता धुडीस मिळतांना दिसत आहे.
वेदांत कंपनी ठाणेवासना परिसरात काॅपर ब्लॉक्सचा अभ्यास करत आहे आणि ब्लॉक्सची व्यावसायिक व्यवहार्यता तपासल्यानंतरच तांबे उत्पादन सुरू केले जाईल.जिल्हा खाण अधिकारी यांनी तांबे उत्पादन सुरू होण्यासाठी ६ वर्षे लागतील असा अंदाज व्यक्त केला होता.सदर कंपनीला लिज मिळुन जवळपास तीन वर्षांचा काळ लोटून सुद्धा कंपनीकडून संथ गतीने काम सुरू आहे.त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना मिळणारी रोजगाराची संधी हुकेल की काय हि चिंता सतावत आहे.
वेदांता रिसोर्रेसेस लिमिटेड या कंपनीला प्रास्पेक्टींग व खाणकाम करण्यासाठी ठाणेवासना काॅपर ब्लाॅकची लिज देण्यात आली.सध्यास्थितीत ठाणेवासना येथे कंपनीचे कार्यालय नसल्याने कंपनीचे सध्याचे स्टेटस काय आहे हे कळू शकले नाही.
