जुन्या रुढी परंपरेला फाटा; ओबीसी क्रांती मोर्चाचे आयोजन
भंडारा | संजय मत्ते
मकरसंक्रांत सण म्हणजे महिलांनी एकमेकींना वाण देणे-घेणे नव्हे तर सावित्रीबाई फुले आणि मा.जिजाबाई यांचे विचार महिलांमध्ये रुजविणे म्हणजेच मकरसंक्रांत होय. ;ओबीसी क्रांती मोर्चा महिलाअध्यक्ष शोभा बावनकर ओबीसी क्रांती मोर्चा महिलांनी मकरसंक्रातीचे अवचित्य साधून विधवा महिलांना मानाचे स्थान देण्यात आले.
सावित्रीबाई फुले व मा.जिजाऊ यांच्या जयंतीचे अवचित्य साधून मकरसंक्रांत सण विधवा महिलासोबत अनोख्या पध्दतीने साजरा करत विधवा महिलांना मानाचा स्थान देऊन त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. जुन्या परंपरेला फाटा दे त विधवा महिलांसाठी सर्व धर्मीय स्नेह मिलन व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्वतः विधवा असलेल्या महिलाध्यश शोभा बानकर होत्या कार्यक्रमाचे संचालन सौ.प्रा.किरण मते यांनी केले तर आभार प्रेरणा ठोबरें यांनी केले.सावित्रीबाई फुले यांनी महिलाच्या शिक्षणाची सुरवात करून देशात एक नवीन क्रांती घडवायला सुरवात केली होती.परंतु देशातील बहुसंख्य कस्टकरी ओबीसी,बहुजन,दलित आदिवासी समाजक्तही मुली खूप मोठ्या प्रमाणात आजही शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना अजूनही शिक्षण मिळत नाही सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या क्रांती चळवळीचा लढा आजच्या परिस्थितीत सुद्धा अपूर्ण आहे त्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.मा.जिजाऊचे प्रेरणा घेत आजच्या नवीन युग काळात आपला शिवबा कसा घडेल यासाठी महिलांनी विचार करण्याची गरज आहे.
शोभा बावनकर यांनी रूढी परंपरेला फाटा देत विधवा महिलांना पण आपल्या भारतीय सामाजिक संस्कृती मध्ये प्रत्येक सण उत्सवात विधवा महिलांना स्थान द्यावे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाला सुनीता सूर्यवंशी,दुर्गा सूर्यवंशी,अगना सूर्यवंशी,प्रिया सूर्यवंशी,शोभा आदमने,कविता भुंशर,सुमी बावनकुळे, अश्विनी वाडीभस्मे,प्रिया मदनकर,पुष्पा मदनकर,लीला मदनकर,निर्मला सेलोकर,सिंधू सेलोकर,वनिता सेलोकर,कनक उजवन,रंजना भिवगडे,श्वेता बावणकर,कांताबाई वैरागडे,श्वेता सेलोकर,ममता सेलोकर,कला गिर्हेपुंजे,मंगला बावनकुळे, किरण मते,ललिता मोटघरे,मंगला भजनकर, बेनू रेहपाडे,रोशनी झंझाड,प्रियंका बैनलवार, किरण फुलबांधे,अनिशा उजवणे,प्रेरणा नेवारे,प्रमिला,अनिता,माधुरी आदी महिला उपस्थित होते.
