अन्यथा 26 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
चंद्रपूर जिल्ह्य़ातील स्थानिक रहिवासी महायुतीतील पाच आमदारापैकी एकाला मंत्री तथा राज्यमंत्री पदी नियुक्ती करून पालकमंत्री पद देण्यात यावे. सफेद झेंडा कामगार युनियन चे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.जर या पाच आमदार जर तुम्हाला जमत नसेल तर कॉंग्रेस चा आमदार आहेत त्यांना पालकमंत्री पद द्यावे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारापैकी पालकमंत्री आम्हाला हवा असा मानसही व्यक्त केला.
महायुती सरकार ने महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री / सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करणे बाबत शासन निर्णय क्रमांकः जिपामं-१३२४/प्र क्र.४७/र.-व-का.-२,तारीख- १८ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करताच चंद्रपूर जिल्हयात खडबडी उडाली. चंद्रपूर जिल्हयात महायुती चे पाच आमदार निवडून आले असून सुद्धा चंद्रपूर जिल्हाला एक सुध्दा मंत्री पद दिले नाही. चंद्रपूर जिल्हयात सहा विधानसभा असुन पाच विधानसभा मध्ये महायुती मधील बीजेपी चे पाच उमेदवार निवडणूक निवडुण आमदार झालेत.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सातवी वेळ विधानसभा निवडुण जिंकले, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातुन, किशोरभाऊ जोरगेवार हे दुसर्यांदा चंद्रपूर विधानसभा मधुन निवडुण आले, चिमुर विधानसभा क्षेत्रातुन बंटीभाऊ बागडिया तिसर्यांदा निवडुण आले, राजुरा विधानसभा क्षेत्रातुन देवरावजी भोंगळे निवडून आले, वरोरा विधानसभा क्षेत्रातुन करणभाऊ संजय देवतळे निवडून आले
असे सहा विधानसभा मधुन पाच विधानसभा मध्ये महायुतीतील बीजेपी ने निवडणुकीत आपला डंका वाजवुन विजयी पथ हाती घेतले. यातच हे पाच निवडुण आलेले आमदार हे चंद्रपूर जिल्ह्य़ातील रहिवासी असून या पाच मधुन आम्हाला स्थानिक पातळीवरचा पालकमंत्री न देता यवतमाळ जिल्ह्य़ातील रहिवासी पालकमंत्री देण्यात आला आहे. हा आमच्या चंद्रपूर जिल्हावरती अन्याय आहे. असे सुरेश मल्हारी पाईकराव यांनी सांगितले.
आम्ही चंद्रपूर वासी ह्या चंद्रपूर जिल्हयावर झालेला अन्याय कदापिही सहन करणार नाही.आम्ही आमचा चंद्रपूर जिल्ह्य़ातील विकास कामासाठी विश्वास ठेवून महायुतीला मतदान करुन सरकार बसविले. आणि महाराष्ट्र सरकारचे शासन बरोबर सुरु सुध्दा झाले नाही. महायुतीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली . हे आम्ही चंद्रपूर वासी सहन करणार नाहीत. महायुतीतील पाच बीजेपी आमदार निवडून आले असुन चंद्रपूर जिल्ह्य़ातील रहिवासी आमदाराला एकही मंत्री पद महायुती सरकार ने दिला नाही याचे विपरीत परिणाम महायुती सरकारला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मध्ये भोगावे लागणार.
बीजेपी ने 2009 ,2014 मध्ये नागपूर चे नानाभाऊ शामकुळे यांना चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत दोनदा आम्ही चंद्रपूर वासियांनी निवडून आणले त्या दहा वर्षात चंद्रपुरचा कुठलाही कसलाही विकास झाला नाही. आणि आता त्यांचा अता पता नाही. आता सुध्दा आमच्या चंद्रपूर जिल्हावरती अन्याय होत आहे. आमच्या चंद्रपूर जिल्हयात अनेक खदानी, स्टिल प्लॉट, सिमेंट कारखाने असुन सुद्धा आमच्या स्थानिक भुमीपुत्रांना रोजगार नाही परप्रांतीय लोकांना इथे रोजगार मिळतो स्थानिक भुमीपुत्रांना नाहीच्या बरोबर रोजगार आहे.
चंद्रपूर वासी महायुतीवरती विश्वास ठेवुन निवडुण दिले. आणि महायुती सरकार ने आमच्या चंद्रपूर जिल्हयावरती इतका मोठा अन्याय केला. याचे परिणाम महायुती सरकारला येणाऱ्या निवडणुकीत दाखविल्या शिवाय आम्ही राहणार नाही. स्थानिक आमदारांस माहीती असते कि आपल्या जिल्ह्य़ात कोणती कामे करायची बाकी आहे. आम्ही आपणास मागणी करतो की महायुती सरकार ने चंद्रपूर जिल्ह्य़ातील पालकमंत्री पदावर घेतलेला निर्णय तत्कालीन मागे घेऊन स्थानिक पाच आमदारामधुन कोणालाही पालकमंत्री पद देण्यात यावे. तसेच एका आमदाराला मंत्री तथा राज्यमंत्री पद देवून चंद्रपूर जिल्हाला न्याय देण्यात यावा. अन्यथा आम्ही चंद्रपूर रहिवासी आमचा स्थानिकांचा हक्कासाठी 26 जानेवारी 2025 रोजीला तीव्र भुमिका घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आणि या आंदोलनामध्ये जे काही नुकसान व भरपाई चे जिम्मेदार स्वत: महायुतीसरकार व महाराष्ट्र राज्य शासन प्रशासन राहील असा देखील इशारा देण्यात आला.
यावेळेस सुरेश मल्हारी पाईकराव, राकेश कातकर, अशोक भगत, शरद पाईकराव, जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, राकेश पराशिवे, बबन वाघमारे, आदी उपस्थित होते.
