चंद्रपूर : रुपेश निमसरकार
रुग्णांना तत्काळ रुग्णालयात पोहोचविण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली. या रुग्णवाहिकेने मागील १० वर्षात तब्बल तीन लाख ३७ हजार ५७७ रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिले आहे.
त्यामुळे ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. ग्रामीण भागात आजही दळणवळणाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरित जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेता, शासनाने गरजू रुग्णांना वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला सुरुवात केली. मागील दहा वर्षात या रुग्णवाहिकेने तीन लाख ३७ हजार ५७७ रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवून नवसंजीवनी दिली आहे.
एका दशकात ७२९ प्रसृती रुग्णवाहिकेत
▪️१०८ च्या रुग्णवाहिकेत गरोदर मातांना नेताना सन २०१४ ते नोव्हेबर २०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत ७२९ यशस्वी प्रसृती करण्यात आल्या आहे.
▪️९८ अति गंभीर असलेल्या रुग्णांना व्हेटिलेटर लाऊन वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यात १०८ च्या चमूला यश आले आहे.
▪️१०८ या रुग्णवाहिकेला कॉल केल्यानंतर रुग्णांच्या शहरातील उपलब्ध रुग्णवाहिक दिलेल्या पत्यावर पोहोचून त्याला रुग्णालयात भरती केले जाते.
पहा रुग्णांची आकडेवारी काय आहे
▪️अपघात – १५८२२
▪️जीवघेणा हल्ला – ११३९
▪️जळलेले – ७५२
▪️हृदयविकार – ३१८६
▪️उंचावरून पडलेले – ३३६४
▪️विषबाधा – ८४२०
▪️गरोदर महिला – ५२२९७
▪️मेडिकल- १९८०५८
▪️आत्महत्येचा प्रयत्न- १६१
▪️इतर – ५४३७८
जिल्हा व्यवस्थापक काय म्हणाले
आपातकालिन सेवेत रुग्णाला सेवा मिळावी यासाठी आमची चमू तत्पर आहे. १०८ वर कॉल आल्यानंतर रुग्णवाहिका त्वरित पाठविली जाते. रुग्णवाहिकेतील डॉक्टरही आपतकालिन स्थितीत रुग्णावर उपचार करतात, त्यामुळे रुग्णांवर वेळेत व सुव्यस्थित उपचार होऊ शकतो. दहा वर्षात तीन लाख ३७ हजार ५७७ रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे – डॉ. पायल तालुकदार, जिल्हा व्यवस्थापक.
