ब्रम्हपुरी | राष्ट्रीय सेवा योजना शिबीर हे विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणाना वाव देते. त्याच्यांत दडलेले कलागुणाना हे व्यासपीठ विकसित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे विद्यार्थ्याना नेतृत्व करण्याची एक संधी प्राप्त होत असते. त्याच्यात संघटनात्मक नेतृत्व, प्रामाणिकपणा, शिस्त वेळेचे व्यवस्थापन या जिवनाउपगोगी गोष्टी शिकायला शिबीरातून प्राप्त होत असतात. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना शिबीर हे व्यक्तिमत्व विकासाबरोबर एक उत्तम नागरिक घडवित असते. असे अँड प्रकाश भैया यांनी मौजा पारडगाव येथे रासेयो समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून केले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री गौरव भैया माजी नगरसेवक न प ब्रम्हपुरी, प्राचार्य डाँ डी एच गहाणे, उपप्राचार्य शुभाष शेकोकर, मेजर विनोद नरड, श्री पिंटु पिलेवान सरपंच पारडगाव श्री सुधीरभाऊ पिलारे उपसरपंच,श्री राहुल प्रधान पो पा. ईश्वरजी ढोरे, सौ मनिषा लाखे, श्री खुशाल डबले, पंकज भोयर व डाँ प्रकाश वट्टी. शिबीर प्रमुख, गोपाल जी करंबे, सुरज मेश्राम उपस्थित होते. यावेळी पाहुण्याचा परिचय डाँ शेकोकरनी केले तर डाँ हर्षा कानफाडे यांनी प्रस्ताविक केले तसेच शिबीराचा अहवाल डाँ दर्शना उराडे यांनी वाचन केले. अनिकेत शेंडे व पकज भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना रासेयो शिबीर हे माणूस घडविण्यासाठी आवश्वयक आहे असे अनुभव व्यक्त केले. तर श्री गौरव भैया यांनी युवकांनी समाजसेवेतून व्यक्तिमत्व साकार करावे असे मौलिक मार्गदर्शन केले. तर प्राचार्य गहाणे यांनी मी माझ्या सेवेत यशस्वी झालो. प्राचार्य पदाची जबाबदारी स्विकारतांना सजग राहणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील सर्वात मोठे कठीण काम असेल तर ते राष्ट्रीय सेवा योजना शिबीर असते. ते माझ्या काळात अतिशय यशस्वी पार पडले. असे भावद्घागार डाँ डी एच गहाणे यांनी केले. तसेच सरपंच,उपसरपंच श्री पिलारे यांनी तर स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतूक केले. सात दिवसीय शिबीरात स्वच्छता अभियान, नालीचे 150 फुट लाब व 2 फुट खोल बांधकाम, डाँ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका परिसर स्वच्छता, छत्रपती शिवाजी महाराज परिसर स्वच्छता व गाव स्वच्छता, अंधश्रध्दा निर्मूलन, संविधान सन्मान जागृती व रक्तक्षय चाचणी असे वेगवेगळे उपक्रम राबवून नागरिकांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाँ विवेक नागभिडकर तर आभार शिबीर प्रमुख डाँ प्रकाश वट्टी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपालजी करंबे, सुरजजी मेश्राम, अनिकेत शेंडे, स्वाती मोहुर्ले, उत्कर्षां पूटकमवार, रिया नागापुरे, पंकज भोयर, अभय पांडे, जुही वासेकर, वेदांत मेहता, गणेश धनजुले, लोमेश आबोणे, ओम नेताम, कार्तिक गुरुनुले,माणस गेडाम, नयन मेश्राम, प्राची, प्रतीक्षा मेश्राम, मयुरी ठेगंरी, सुषमा ढुसे शिवानी नागोसे, रोहीनी हजारे यांनी अथक परिश्रम घेतले. ई. स्वयंसेवक उपस्थित होते.
