
व्यसनाधीन मुलाचा बापाने केला खुन !
जळगांव जामोद -तालुक्यातील ग्राम आसलगांव येथे व्यसनाधीन मुलाचा बापानेच खुन केल्याची घटना १४ मार्च २०२४ च्या सकाळ उघडकीस आली . आसलगांव बाजार येथील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे वय ६८ वर्ष यांचा मुलगा शिवाजी हा व्यसनाधीन असल्याने घरातील सर्व सदस्यांना शारीरीक व मानसिक त्रास देत होता त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून १३ मार्च २०२४ च्या रात्री झोपेतच बापाने मुलाच्या गळयावर कुऱ्हाडीने वार करून खून केला असा जबाब आरोपी वडीलांनी दिल्याने त्यांच्या विरोधान जळगांव पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला .
