आमदार मनोज कायंदे यांचीही होती उपस्थित
लोणार | भागवत आटोळे
सामाजिक कार्यकर्ते देवानंद सानप यांच निवेदन असो किंवा आंदोलनाचा इशारा याची प्रशासनाला दखल घ्यावीच लागते हा परीसरातील नागरीकांना अनुभव आहे आणि देवानंदजी सानप यांनी निवेदन दिले म्हणजे आमच्या रस्त्याचे काम मार्गी लागणार अशा आशा परीसरातील शेकडो नागरीकांना लागुन राहतात हे विशेष.
मदत पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांनी दिले सानप यांना रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन सिंदखेडराजा मतदार संघातील शेवटच्या टोकावर असलेल्या व लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जटटू या मुख्य भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून भुमराळा किनगाव जटटू मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या नशिबी अजूनही भोग सुरुच आहे या मार्गावर ये जा करणारे वाहन चालक,शेतकरी, विद्यार्थी, अक्षरशा त्रस्त झाले आहे आज घडीला हा मार्ग विद्यार्थ्यांसाठी व वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे
भुमराळा येथुन हा मार्ग मुख्य मार्ग व जागतिक लोणार सरोवर ते संभाजीनगर मार्गाला जोडल्या गेला असुन या मार्गाने गावकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थांची मोठी वर्दळ असते परंतु मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून गिट्टी उघडली असल्याने मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रात्री खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारकांचे अनेक अपघात होतात
पावसाळ्यात तर जिवघेणी कसरत करावी लागते व अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी जिल्ह्यचे पालकमंत्री ना.मंकरद पाटील यांना सिंदखेडराजा येथे भेटुन दिले भुमराळा किनगाव जट्टु परीसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते
निवेदन देतेवेळेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच बुलढाणा पालकमंत्री मा.ना.श्री. मकरंद जाधव पाटील तथा मतदार संघाची जाणीव असलेले आमदार श्री. मनोज भाऊ कायंदे यांच्या उपस्थितीत भुमराळा ते किनगाव जटटू रस्त्याच्या कामा संदर्भात स्वतः भेट घेऊन रस्त्यांची परिस्थिती समजावून सांगत निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री व आमदार महोदय यांनी शब्द दिला की लवकरच डांबरीकरण कामाला सुरुवात करु असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले
