मुंबई – दिनांक १६ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने अखेर वृद्ध कलावंत
व साहित्यिकांच्या मानधनात दुप्पट
वाढ करित असल्याचे जाहीर केले.
प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांच्या
झुंजार नेतृत्वात
२५ जुलै २०२३ रोजी मुंबईतील
आझाद मैदानावर आणि त्याच दिवशी
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी
कार्यालया समोर प्रचंड असे
मोर्चे काढून कलावंता तर्फे
“भजन आंदोलन”करण्यात आले होते.
एकाच दिवशी सर्व महाराष्ट्रात
लोककलावंतांनी केलेल्या
आंदोलनाची सांस्कृतिक
मंत्री मा.ना.सुधीर मुनगंटीवार
यांनी त्वरित दखल घेऊन विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वातील कलावंतांच्या
शिष्ट मंडळास विधान भवनात बोलवून
कलावंतांच्या प्रश्नावर सखोल चर्चा केली.
कलावंत मोर्च्येकऱ्यांच्या
बारा मागण्या पैकी चार मागण्या
त्वरित सोडवल्या जातील असे
जाहीर केले आणि वृद्ध कलावंतांचे
मानधनात प्रथम दुप्पट वाढ केली
जाईल असे आश्वासन दिले.
तेंव्हा पासून सतत पाठपुरावा
केल्या मुळे २९ नोव्हेंबर २०२३ रोजी
मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांच्या
मुख्यसचिवांच्या उपस्थितीत सरकार तर्फे निर्णायक बैठक बोलविण्यात आली १६ मार्च २०१४ रोजी शासना तर्फे वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात आली . यामध्ये शाहीर विष्णु (अन्ना) शिंदे यांचा शिंहाचा वाटा आहे .
