
जळगांव जा . शहरात बैल पोळा सन उत्साहात साजरा !
जळगांव जा . – वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये राबराब राबुन आपल्या मालकाच्या शेतीमध्ये सोनं उगवण्यास मदत करनारा बैल आज त्याचा पोळा हा बैलांचा सण मोठ्या उत्साहात जळगांव जा . शहरात साजरा करण्यात आला . सर्वप्रथम पंचशील नगर ( सुनगाव वेस ) शिद्धार्थ नगर ( खेर्डावेस ) भीमनगर (माळी खेल ) वायलीवेस आणि दुर्गाचौक या सर्व ठीकानी शेतकरी बांधवांनी बॅन्ड बाज्याच्या गजरात बैलांची मिरवनुक काढुन मोठया उत्साहात बैल पोळा साजरा केला . शहरातील पुरुष आणि महिला व बाल गोपाल मोठया संख्येने प्रत्यक बैलपोळा मध्ये उपस्थित होते . या वेळी बैल पोळा मध्ये पोलीस बंदोबस्त चोख होता .
