• संतोष लहाने; शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
मुंबई/पंकज मोरे
शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय समाविष्ट करून अध्यापना करिता कृषी शिक्षक भरतीसाठी कृषी पदविका, पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारकांची नियुक्ती करावी अशी मागणी मराठवाडा विभाग कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे उपाध्यक्ष संतोष लहाने यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय शिकवला जावा या अनुशंगाने सन २००६ मध्ये शासन निर्णय जारी करीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्या अध्यक्षते खाली अभ्यासक्रमाचे स्वरूप निश्चितीसाठी समिती स्थापन करण्यात आली त्यानुसार, समितीने अहवाल सादर केला. मात्र अद्याप अहवाल गुलदस्यात आहे.
कृषी विषयक शालेय अभ्यासक्रमात चालू केल्यास विद्यार्यांमधील शेतीविषयक अज्ञान दूर करणे, रोजगार निर्माण करणे हा मूळ हेतू होता. परंतु यात संबंधित मंत्री यांनी केवळ घोषणा केली. परंतु, याची अमंलबजावणी कधी होणार असा प्रश्न संपुर्ण महाराष्टातील हजारो कृषी विद्यार्थ्यांना पडला आहे.
भारतात छतीसगड सारख्या छोट्या राज्याने कृषी विषयक अभ्यासक्रम शालेय शिक्षणात लागू केला. दिल्ली, राजस्थान व उत्तरप्रदेशने ही लागू केला असतानाही प्रगतीशील, पुरोगामी महाराष्ट्राने का लागू केला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित मंत्री यांनी कृषीच्या विद्यार्थ्यांना कृषी विषयाचे व्यापक ज्ञान असल्यामुळे कृषी विषय शिकवण्यासाठी कृषी पदविका, पदवीधर व पदव्युत्तर पदवी धारकांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून हजारो कृषी विद्यार्थ्यांना कृषी रोजगार निर्मिती होईल. शालेय शिक्षणामध्ये कृषी शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यास मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. तसेच शेतीचे शास्त्रशुद्ध शिक्षणही दिले जाईल. तरी संबंधित मंत्री यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा. अशी मागणी मराठवाडा विभाग कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे उपाध्यक्ष संतोष लहाने यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
